Monday, 30 July 2012

ऑलिंपिक उद्घाटन सोहळा....अविस्मरणीय अनुभव

 लंडन ऑलिंपिक उद्घाटन सोहळा २०१२ - आइल्स ऑफ वंडर

आयुष्यात प्रत्यक्षात पाहीलेला मी हा पहिलाच सर्वात मोठ सोहळा, अगदी डोळे दिपून गेले भव्य रोषाणाईने.

एक-दीड महिन्यापासून रोज... अगदी न चुकता ऑनलाईन तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता, खरं तर तिकिटे एखाद्या खेळाची मिळावीत असा कल होता...अशी संधी पुन्हा-पुन्हा मिळणार नव्हती :) लॉन-टेनीसची तिकिटे मिळाली तरीही मन प्रयत्न करायचे सोडायलाच तयार नव्हतं . अचानक.. हो हो अगदी अचानक , अनपेक्षीतपणे ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्याची तिकिटे विक्रीसाठी ऑनलाईन दिसली (तशी ती आधीपासूनच होती पण किम्मत बघता खिशाला परवडण्यासारखी नव्हती) आणी मागचा-पुढचा, किमतीचा (तरी ही महाग पण परवडेल अशी ;) ) विचार न करता सरळ विकत घेऊन टाकली. आम्हाला तर आकाश ठेंगणं झाल्यासारखे वाटले, बस वाट बघु लागलो होतो २७ जुलाईची.

शेफिल्डवरुन आम्ही लंडनला दुपारीच पोहोचलो, हॉटेलला चेक-इन करुन , सामान टाकून आम्ही स्ट्रार्डफोर्ड ला जायला निघालो, तिथेच ऑलिंपिक पार्क उभे केले आहे. सर्वत्र गर्दीच गर्दी होती. वातावरणात एक प्रसन्नता, उत्सुक्ता होती. सुरक्षा व्यवस्था इतकी चांगली होती सगळे सुरळीत झाले. अम्हाला वाटले होते स्टेडियमच्या आत जायलाच भल्या मोठया रांगेत तासंतास उभे राहावे लागते की काय पण तसे न होता स्टेडियमला आम्ही पावणे पाचलाच पोहोचलो. सोहळा सुरु व्ह्यायला अजून चार तासाचा अवकाश होता पण इतका उत्साह होता की चार तास काय आणखीन आठ तास थांबायची तयारी होती आमची. थोडेसेच स्वस्त तिकिट असल्यामुळे रेट्रीक्टेड व्ह्यु असा होता, सोहळ्याचा भाग म्हणून मैदानात विशाल वृक्ष उभं केलं होतं त्यामुळे थोडासा अडथळा येत होता, पण त्याने आमच्या आंनदाला, उत्साहाला काहीच फरक पडला नव्हता, जे मिळाले त्याने आम्ही भारावून गेलो होतो.

सोहळा इतका झोकात सुरु झाला आणी आम्ही पुढचे तीन तास खिळून बसून बघू लागलो, ८० हजार लोकांची संख्या आणी हा जल्लोष मी शब्दात ही व्यक्त करु शकत नाही. गेले दोन रात्री आम्ही बस त्या सोहळ्याच्या भव्य उत्सवात कसे रमलो होतो तेच आठवत आहोत, एक अविस्मरणीय असा अनुभव जो आमच्या मनावर अगदी मोहिनी घालून गेला आहे.

मी काढलेले काही फोटो इथे देत आहे, आशा आहे तुम्हाला ते आवडतील :)

स्टेडियमला जाताना....

.

स्ट्रार्डफोर्ड ऑलिंपिक पार्क

.

सोहळ्यापुर्वी दिसणारे आतील मैदान....

.

खचाखच भरलेले स्टेडियम....

.

.

प्रेक्षाकांनी भाग घेऊन व्हेव केलेले सील्क

.

ब्रिटनची ग्रामीण संस्कृती (ब्रिटिश कंट्री साईड)

.

औद्योगिक क्रांती

.

.

.

ब्रेडली विग्गिन्स टुर दी फ्रांस चा विजेत्याने घंटानाद करुन सोहळ्याला आरंभ केला

.

नॅशनल हेल्थ सर्विस

.

ब्रिटिश पॉप म्युझिक व फिल्म

.

युनियन जॅक

.

रोषणाई पाहून डोळ्याचे पारणे फिटले

.

अ‍ॅथलिट परेड

.

भारत संघाचे आगमन :)

.

.

ग्रेट ब्रिटन चे आगमन

.

आतषबाजी

.

.

ऑलिंपिक क्वाड्रन

.

ऑर्बिट

.

अविस्मरणीय असा भव्य-दिव्य सोहळा....

.

No comments:

Post a Comment