तर या लॉकडाऊनमध्ये अहोरात्र काम करणार्या NHSच्या कामगारांचे खूप मोठे योगदान होते / आहे. आपल्या मुलांना डे केअरला सोडून कोविड व इतर रुग्णांच्या सेवेसाठी ते कायम हजर असायचे. त्यांच्या व इतर एसेंशियल कामगारांसाठी दर गुरुवारी आठ वाजता पाच मिनिटांसाठी टाळ्या वाजवल्या जाई, घंटानाद होई. त्या दरम्यान आमच्या गल्लीतले काहीजण बाहेर रस्त्यावर येऊन टाळ्या वाजवी तर काही आमच्यासारखे खिडकीत उभे राहून वाजवी. त्याच वेळी आम्ही सगळेजणं एकमेकांना हात करून विचारपूस करत असू. माझ्या खास मैत्रिणीचे मामा इंग्लंडमध्ये पीडॅट्रीशियन होते. वय वर्ष ६८ असतानादेखील या कठीण काळात त्यांनी कोविड पेशंट्स ही सेवा केली पण दूर्दैव असेकी त्यांना याच विषाणूची लागण झाली आणि ते गेले. फार वाईट वाटले. जिथे डॉक्टर्स रुग्णांचे प्राण वाचवण्याचे अथक प्रयत्न करत होते तिथे अनेकजण दगावले देखील होते. अनेक मदतीचे हात धावूनही आले होते. जे वृद्ध आहेत, एकटे राहतात त्यांच्याशी फोनवर गप्पा मारण्यासाठी, त्यांना वेळ देण्यासाठी अनेक Volunteers उभे राहिले. आमच्या गल्लीत राहणार्या एका कुटुंबाने घरोघरी चिट्ठ्या टाकल्या, कुणाला वाण-सामान, औषधं किंवा गरजेच्या वस्तू हव्या असल्यास अमुक नंबरवर संपर्क करावा. ते आणून दारात ठेवतील, काही लोकांची ही चांगली बाजून देखील दिसली.
लॉकडाऊनची घोषणा झाली आणि मला फार मोठ्या अनुभवातून जावे आगले. मार्च अखेरीस माझा दात फार दुखायला लागला. बरे कुठे कॅव्हिटी आहे आणि दुखतोय तर समजले, हे म्हणजे फिलिंग केलेला दात अतिप्रमाणात दुखू लागला, गालावर सूज आली. इथे सगळचं बंद, डेंटिस्टचा चेक-अपसाठी बोलावण्याचा प्रश्नचं नव्हता आणि मी दुखण्याने बेजार झाले होते. पहिले एक-दोन दिवस पेनकिलर घेतल्या तेवढ्यापुर्ते बरे वाटे पण पुन्हा दुखू लागे. मागच्या गल्लीतच आमचा डेंटिस्ट आहे आणि तिथे दोन तर भारतीयच डेंटिस्ट प्रॅक्टिस करतात. त्यांना फोन लावला, तर आधी काय होते, किती दुखते, पेन कसं होते, एक्स्प्लेन करा म्हणून सांगितले मग ही सर्व माहिती माझ्या डेंटिस्टपर्यंत पोहोचवली. मग मला त्याचा थोड्यावेळाने फोन आला आणि सर्व त्रास समजून त्याने मला पेनकिलर घे, दात २-३ वेळा ब्रश कर, सॉल्ट वॉटरने रींस कर, फ्लॉस कर as normally you would असे सांगितले.
मी त्याला खूपदा सांगितले की मी सर्व काळजी घेऊन दवाखान्यात येते तू एकदा बघ पण त्याने सांगितले की नव्या गाईडलाईंस प्रमाणे पर्सनली कुणालाच बघायचे नाही असे कळवले. मग ४-५ दिवस दुखर्या बाजूने खाणे बंद केले बाकी ब्र्शींग, फ्लॉसींग, रींसीग सूरुच होते. दिवसा पॅरेसीटेमॉल घेऊन कोल्ड कम्प्रेस वापरून दिवस ढकलायचे रात्री पेनकिलर घ्यायचे, मला पेनकिलरचा मारा नको होता. एक आठवडा झाला तरी काही दुखायचे थांबेना, भारतातल्या डेंटिस्ट मैत्रिणीलाही फोन करून झाले होते पण माझ्या दातदुखीवर सध्यातरी काहीच करण्यासारखे नव्हते. शेवटी NHS111 वर फोन केला. तिथल्या डॉक्टरने वेगळ्या पेनकिलर व अँटिबायोटीक्स प्रीस्क्राईब केले व डे अँड नाईट फार्मसीमधून पिक करायला सांगितले. तो ही एक आठवड्याचा कोर्स होता. तो कोर्स पूर्ण झाला. औषधे थांबली की दुखणे सुरूच, जाम वैतागले होते मी या लॉकडाऊनला.
शेवटी पुन्हा माझ्या डेंटल सर्जरीला फोन केला, तिथल्या सिनियर डॉकटरशी बोलले. तिने मला अजून एक आठवड्याचे अँटीबायोटिक्स प्रीस्क्राईब केले मी कप्पाळावर हात मारला, आलिया भोगासी असावे सादर. असा हा कोर्स संपेपर्यंत एप्रिलचा तीसरा आठवडा उगावला आणि माझी दातदुखी मिरॅक्युलसली थांबली. तरी प्रिकॉशन म्हणून मी त्याबाजूने खाणे थांबवले होते. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला फॉलोअप कॉल आला आणि सांगण्यात आले की सर्जरी उघडताच मला इन पर्सन तपासण्यात येईल. पुढे जेव्हा जून महिन्यात सर्जरी फक्त प्रॉयॉरीटीवर असणार्यांना बघण्यासाठी उघडली तेव्हा मला बोलावण्यात आले . सर्जरी अपॉईंटमेंट मिळाली, ठरलेल्या वेळी मला सर्जरीच्या बाहेर उभे रहायला सांगण्यात आले. आपण आल्याचा फोन त्यांना करून कळवायचे होते तसे केले. नर्स दारात येऊन आधी तुमचे टेंपरेचर चेक करते, हातावर सानिटायझर देते. त्यानंतर ती तुम्हाला पायात चढवायला डिस्पोझेबल ओव्हरशूज देते, मास्क किंवा फेस शिल्ड अगदी गरजेचे. त्यानंतर डेंटिस्ट तुम्हाला तपासतो. पण या दरम्यान हा जो काही वैद्यकीय अनुभव मला आला, जो मनस्ताप झाला तो न विसरण्याजोगा आहे. लॉकडाऊनमध्ये बाबा कधी कुणाला दाताचे दुखणे उद्भवू नये रे देवा.
४ जूनपासून लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आले. हॉटेल्स, पब्स, फुड डिलिव्हरी, टेकअव्हे सुरु करू शकतात असे सांगण्यात आले. हॉलिडे होम्स, कॉटेजेस, कॅरॅव्हॅन पार्क्स सोशल डिस्टंस पाळून उघड्ण्यात आले. पार्क्स सुरु झाले तरी इन-डोअर सॉफ्ट प्ले एरीया, स्विमींग पूल्स,जीम बंद होते. दुकाने सुरूच होती आणि आम्ही ऑनलाईन गोर्सरी मागवत होतोच. एका मित्राने सप्लायरशी बोलून त्यांच्याकडे भारतीय भाज्या, आंबे मोठ्या प्रमाणात मागवायला सुरू केले. त्यामुळे आपल्याला हवे त्या भाज्या, हापूस, केसर आंबे आम्ही जाऊन त्याच्याकडून पिक करत असू. काँटॅक्टलेस व्यव्हार असल्यामुळे सोपे जात होते.
बहुतेकांनी या काळात वेळ जायला घरात रंगाची, डागडूजी (स्वतः करत), बागकाम करायला सुरूवात केली. या वर्षी तर आम्हाला भाज्या, फळझाडं लावायला माती, बियांसुद्धा मिळाल्या नाही.
हळू-हळू गर्दी वावाढूलागली. इकडच्या लोकांना बीच हॉलिडेचे वेध लागले होते बिन्डोक कुठचे. असे वावरत होते जणू कोरोना केव्हा पळून गेला. यांच्या या अशा वागण्यामुळे आता पुन्हा युकेमध्ये केसेस वाढू लागल्यात. काही लोकांच्या बेफिकीरीमुळे बाकीचे लोकं निषकारण suffer करतायत. शाळा २ सप्टेंबरपासून सुरू झाल्या आणि शाळेत केसेस दिसू लागल्या तरीही सरकारचे पहिले पाढे पंचावन्न. कधी समजणार आहे यांना की लॉकडाऊनची गरज आहे. ज्या रेटने केसेस वाढतायत त्याने भीती वाटू लागली आहे. अक्टोबरला हाफ टर्म हॉलिडे सुरू होतील तेव्हा कदाचित बंद करतील अशी चर्चा आहे पण तोपर्यंत काय? देवा हे कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे बाबा आता. न्यु नॉर्मल म्हणत लोकं जगतायत पण पूर्वीसारखे मोकळेपणे वावरायला, एकमेकांना भेटायला, आपल्या माणसांसोबत रहायला लवकरच सर्वांना मिळू दे, हे जग पूर्वीसारखेच सुंदर बनू दे, मोकळ्या हवेत सर्वांना श्वास घेता येऊदे हीच प्रार्थना.
No comments:
Post a Comment