Monday, 8 March 2021

स्प्रिंग!!

 मी रोज डोर / टॉटली रेल्वे स्टेशनपर्यंत वॉकअला जाते. स्टेशनच्या पुढे चालत गेले की तिथे एक तळे आहे. त्यात अनेक बदके विहार करत असतात, उन्हाळा आला की तिथे अनेक वृद्ध येतात फिशींग करायला. एखाद्या ऊन असलेल्या दिवशी मी जर तिथे गेले तर तिथले फोटो नक्की काढेन.

मॉर्निंग वॉकला जाताना आताशी रस्त्याच्या कडेला स्प्रींगची चिन्हं दिसू लागलीयत. नुकतीच कुठे कुठे डॅफोडिल्सनी डोकी वर काढलियत, काही दिवसातचं संपूर्णपणे उमलतील. काही घाई- घाईनंच उमलू पाहतायत. छान पिवळी- पांढरी डॅफोडील्स या एवढ्या काळापूर्तेच फुलतात पण त्यांच्या साधेपणातच त्याचे खरे सौंदर्य दडले आहे. त्यांच्या सोबतीला स्नोबेल्स,  अनेक वाईल्ड फ्लावर्स जांभळी, पिवळी, पांढरी , मधूनच एखादे लाल फुल असे अनेक छोटी छोटी फुलं फुलतात. जवळचं अनेक चेरीची, चेस्टनट्सची मोठाली झाडे आहेत. अजूनही निष्पर्ण, त्यांच्या फाद्यांना कोंब यायला सुरूवात होतेय. काही महिन्यातचं ही झाडे अनेक फळांनी लगडलेली दिसतील. रॉबीन, मॅगपायसारखे पक्षी दिसायला लागलेत. सकाळचे कधी कोवळे ऊन तर कधी ढगाळ वातावरण तरी एक प्रसन्नता असते, रस्त्यावर गाड्यांची ये - जा, मधूनच कुत्र्यांना वॉकला घेऊन आलेले आजोबा, वाटेतल्या सुपरमार्केटला सकाळीच आलेली आजी दिसते. एकमेकांना क्रॉस होत असताना हलके केलेले स्मित असो किंवा गुड मॉर्निंग असो छान वाटतं एकदम. कुणी जॉग करतं तर कुणी सायकल चालवत जातं. एकंदरी स्वतःसाठी प्रत्येकांनी वेळ काढलेला असतो. 











No comments:

Post a Comment